

Amanwadi railway youth ends life
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अमानवाडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ असलेल्या सागाच्या झाडाला साडीच्या कापडाला गुंडाळून एका युवकाने जीवन संपविल्याची घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी 5:00 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
युवकाचे नाव निशान भारत गिरी (वय 38, रा. सिद्धिविनायक नगर, वाशिम) असे असून सदर घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस स्टेशनचे ए एस आय श्रीवास्तव व पोलीस कॉन्स्टेबल अरुण भुरकाडे पोलीस पाटील रंगराव ईखार प्रवीण गनोदे आदींनी घटनास्थळी येऊन मृताच्या खिशातील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटवली. पुढील तपास जऊळका पोलीस करत आहेत.