वाशीममध्ये भरदिवसा तरूणाचा धारदार शस्राने खून

शहरातील पोलिस स्थानकाजवळील घटना
Washim murder news
वाशीम शहरात भरदिवसा धारदार शस्राने तरूणाचा निर्घृण खून झाला.Pudhari File Photo
Published on
Updated on

वाशीम : शहरात भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी एका तरूणाचा धारदार शस्राने हल्ला करून निर्घृण खून केला. ही घटना शहर पोलिस ठाण्याच्या पाठीमागे गुरूवारी (दि.२९) सायंकाळी ४.३० वाजता घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राहुल वाघ (वय २९) असे या तरूणाचे नाव आहे.

Washim murder news
हिंगोली : डोळ्यात मिरचीपूड टाकून तलाठ्याचा निर्घृण खून

शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच राहुल वाघ या तरूणावर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर हा तरूण जखमी अवस्थेत चालत येऊन एका हॉटेलजवळ कोसळला. या दरम्यान ५० फुटाचा रस्ता रक्ताने माखला होता. त्यानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. राहूल वाघ हा तरूण एका खाजगी दवाखान्यात काम करायचा, अशी माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा शहर पोलिस कसून तपास करीत आहेत.

Washim murder news
आडगाव रंजे येथे सज्जा कार्यालयात तलाठ्याचा चाकूने भोसकून खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news