

वाशीम : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील शेतकरी रमेश धांडे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. यादरम्यान ब्लास्टिंग घेण्यासाठी विहिरीत मशीनद्वारे छिद्र घेण्याच काम सुरू असताना अचानक विहिरीचा काही भाग खचुन मजुरांच्या अंगावर मलबा पडला. या घटनेत दोन मजूर ठार झाले असून घटना आज (दि. १८ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली.
प्रल्हाद उकंडी देवकर ( रा. एकलासपूर ) आणि प्रकाश रावसाहेब देशमुख ( रा. मोठेगाव) असे जागीच मृत्यू झालेल्या मजुरांची नाव आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती.