Washim SP | तरुण पिढीला व्यसनापासून वाचवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा : निकेश खाटमोडे-पाटील

तंबाखूमुक्त शाळा’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन
Washim SP Nikesh Khatmode Patil
Washim SP Nikesh Khatmode PatilPudhari
Published on
Updated on

Washim SP Nikesh Khatmode Patil

वाशीम : स्थानिक जिल्हा परिषद वसंतराव नाईक सभागृहात ३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व ‘सलाम मुंबई फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’तंबाखूमुक्त शाळा’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील (आयपीएस) उपस्थित होते.

या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भुसारे, उपशिक्षणाधिकारी डाबेराव आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सारिका कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण व आरोग्य विभागाचे समुपदेशक सरकटे व धाडवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील एकूण १०९ अधिकारी व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

Washim SP Nikesh Khatmode Patil
Washim news: अनसिंग बसस्थानकासमोर पाऊसाच्या पाण्याचे झाले ‘तळे'! प्रवाशांचे हाल

आपल्या मार्गदर्शनात बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी तंबाखू आणि इतर व्यसनांचे समाजावर होणारे घातक दुष्परिणाम स्पष्ट केले. शाळांच्या परिसरात व्यसनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कायदे, सुव्यवस्था आणि प्रशासकीय नियमांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळांचा परिसर व्यसनमुक्त ठेवण्यासाठी शिक्षकांनी वेळीच योग्य पावले उचलावीत, असे ते म्हणाले.

व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन व शिक्षणाधिकारी भुसारे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. दिवसेंदिवस वाढणार्‍या व्यसनाधीनतेच्या प्रमाणावर वेळीच आळा घालण्यासाठी शाळा स्तरावर कोणत्या उपाययोजना राबवता येतील, यावर सविस्तर चर्चा झाली.

Washim SP Nikesh Khatmode Patil
Washim crime : कौटुंबिक वादातून जावयाची निघृण हत्या ; ३ मेहुण्यांना ५ वर्षांचा सश्रम कारावास

सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सारिका कदम यांनी ’तंबाखूमुक्त शाळा’ या संकल्पनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या नवीन निकषांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी तंबाखूमुक्त शाळेचे मास्टर ट्रेनर अमोल काळे यांनी शंकांचे निरसन आणि ’तंबाखूमुक्त भारता’चा संकल्प या विषयावर मत व्यक्त केले.

सत्राच्या शेवटी प्रशिक्षणार्थी शिक्षक व अधिकार्‍यांच्या विविध शंकांचे मार्गदर्शकांनी समाधानकारक निरसन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी, कार्यशाळेतील सर्व उपस्थित अधिकारी आणि शिक्षकांनी ’तंबाखूमुक्त भारत’ घडवण्याचा दृढ संकल्प केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news