

Washim Accident Travels Bus hits girl Watch CCTV
वाशिम: घरातून सायकलवरून क्लासला जाण्यासाठी निघालेल्या मुलीला रस्ता ओलांडताना भरघाव खासगी बसने उडविले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाशिम शहरात शुक्रवारी (दि. 5) घडली.
वाशिममधील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत संध्या उमेश सारसकर (वय १६) ही मुलगी शिकत होती. ती दहावी इयत्तेत होती. शुक्रवादी दुपारी संध्या क्लासला जाण्यासाठी सायकल घेऊन घरातून निघाली होती. रस्ता मोकळा असल्याने सायकलवरून तिने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी पुसदकडे वेगाने जाणाऱ्या बसने जोरदार धडक देऊन सायकलला उडविले.
बसच्या धडकेत संध्या रस्त्यावर फेकली गेली. सायकल रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन पडली. तर संध्याच्या अंगावरून बसचे चाक केले. अंगाचा थरकाप उडविणारी ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. संध्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.