

वाशिम : वाशिम जिल्हयातील तरूण-तरूणांकरीता वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 'उमंग एक संधी स्वप्नपूर्तीची, उमंग एक पाउल स्वप्नपूर्तीकडे' भव्य रोजगार मेळावा ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यासाठी आतापर्यंत ४५०० पेक्षा अधिक तरूण तरूणांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केलेले आहेत. मेळाव्यासाठी अमरावती, नागपूर, पूणे, संभाजीनगर व जालना येथील खाजगी नामांकित १०४ कंपन्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून आणखी काही कंपन्या नोंदणी करण्याची शक्यता आहे. त्यामधील सुमारे ७० ते ७५ नामांकीत कंपन्यांना रोजगार मेळाव्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. हॅपी फेसेस, दि कन्स्पेट स्कूल, शेलू बाजार रोड, वाशिम येथे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वा दरम्यान हा मेळावा होणार आहे.
मेळाव्यास येणारे उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असून प्रेशर उमेदवार यांचेकरीता वयोमर्यादा १८ ते २८ आणि अनूभवी उमेदवारांना साठी १८ ते ३२ वयोमर्यादा आहे..मेळाव्यामध्ये टाटा, महिंद्रा, बजाज, स्कोडा तसेच बँकीग सेक्टरच्या ICICI, अॅक्सिस बँक यासारख्या नामांकित कंपन्या व इतर बँकांचा सामावेश आहे.