Washim RTO news | फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई...

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे
Washim RTO news | फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई...
Published on
Updated on

वाशीम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे. नियमबाह्य, अस्पष्ट तसेच स्टायलिश पद्धतीने लिहिलेल्या नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

Washim RTO news | फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई...
Washim Crime | स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धडक कारवाई

वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवत अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला. पोलिस प्रशासनाने नागरिकांना वाहनांवर शासनमान्य नंबर प्लेटच लावण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

Washim RTO news | फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई...
Washim Crime | स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धडक कारवाई

शहर वाहतूक शाखेने शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या वाहनावर वाहतुक शाखेने धडक कारवाई केली या विशेष मोहीमेव्दारे ३३ वाहनावर कारवाई करून २२०००/- हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. वाशिम शहरात वाहनधारकांनी अधिकृत नंबर प्लेटचाच वापर करावा दादा, काका, मामा तसेच आईचा आशिर्वाद,पाटील अशा वेगवेगळया नावाची फॅन्सी नंबर प्लेट वापरतांना आढळुन आल्यास अशा वाहनधारका विरूध्द कडक कारवाई करण्यात येईल. सदर मोहीम ही यापुढे देखील वेळोवेळी राबविण्यात येणार आहे. नागरीकांना अशा पध्दतीने वाहनधारक फॅन्सी नंबर प्लेट चा वापर करत असल्याचे दिसल्यास शहर वाहतुक शाखा वाशिम यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात येते.

Washim RTO news | फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई...
Washim Crime | स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धडक कारवाई

सदरची कारवाई निकेश खाटमोडे पाटील पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक, बाळासाहेब किसनराव नाईक यांचे टिम पोहेकॉ / ८५६ रामकृष्ण नागरे, सुनिल गजभार, संगिता शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, राहुल गवई, शिवकुमार घुगे,प्रविण जाधव, मपोकॉ मनिषा चौके, ज्योती इंगोले, शालु इंगळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news