Washim News | नायलॉन मांजा विक्रेत्याला अडीच लाखांचा ;तर वापरणाऱ्यास २५ हजारांचा दंड! पोलिसांची करडी नजर!

वाशीम पोलिस कडक कारवाई करणार : जीपोअ. निकेश खाटमोडे-पाटील
Nylon/Synthetic Manja
Nylon/Synthetic Manja
Published on: 
Updated on: 

वाशीम : पतंग उडविण्याचा आनंद घेताना पक्ष्यांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात वाशीम पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्याला २५ हजार रुपये, तर त्याची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्याला तब्बल अडीच लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे पतंगप्रेमीसह विक्रेत्यांनीही सावध राहण्याचे आवाहन वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे- यांनी केले आहे.

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथील सुमोटो जनहित याचिका क्र.०१/२०२१ मधिल दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजीचे आदेशानुसार सर्व नागरिकांना, पतंग उडविणारे शौकीन आणि विक्रेते यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, नायलॉन मांजा (Nylon/Synthetic Manja) मुळे पक्षी आणि मानवी जिवितास होणारा धोका लक्षात घेता, मा. उच्च न्यायालय, नागपुर खंडपीठ यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मा. उच्च न्यायालयाने दिनांक १२/०१/२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री करतांना आढल्यास खालील प्रमाणे कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

१) वैयक्तिक व्यक्ती / पंतग उडविणारे कोणतीही व्यक्ती नायलॉन मांजासह पतंग उडवतांना आढळल्यास, त्या व्यक्तीस रूपये २५,०००/- (अक्षरी पंचवीस हजार फक्त) दंड आकारण्यात येईल.

२) जर कोणी व्यक्ती अज्ञान (Minor) असेल, तर सदर दंडाची रक्कम त्या मुलाच्या/मुलीच्या पालकांकडुन वसुल केली जाईल.

३) विक्रेते (Vendors) कोणत्याही विक्रेत्याकडे नायलॉन मांजा आढळल्यास किंवा विक्री करतांना आढळल्यास त्यास रूपये २,५०,०००/- (अक्षरी रूपये दोन लक्ष पन्नास हजार फक्त) दंड आकारण्यात येईल.

४) सदर दंड हा प्रत्येक वेगवेगळया गुन्ह्यासाठी (For each default) वेगवेगळा लागु असेल.

५) सदर दंडाची रक्कम जागेवर भरता न आल्यास, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मेमो दिला जाईल आणि १५ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास, ती रक्कम महसुल थकबाकी (Land Revenue) म्हणुन कायदेशिर प्रक्रियेद्वारे वसुल केली जाईल.

६) या जाहीर सूचनेची माहिती नव्हती किंवा अज्ञात होते, ही बाब सबब दंड टाळण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळुन स्वतःचे व इतरांचे प्राण वाचवावेत व वाशीम जिल्हा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा नियत्रंण कक्ष व्हॉटसअॅप नंबर ८६०५८७८२५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन या जनहित याचिके द्वारे वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.