Washim news | अवैध सावकारांचे धाबे दणाणले! रिसोड तालुक्यात सहकार विभागाची मोठी कारवाई

दोन स्वतंत्र पथकांमार्फत झडती घेण्यात आली
Washim news | अवैध सावकारांचे धाबे दणाणले! रिसोड तालुक्यात सहकार विभागाची मोठी कारवाई
Published on
Updated on

वाशिम : रिसोड तालुक्यात अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या दोन तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने झडतीची कारवाई केली.

सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी गैरअर्जदार सचिन गणराजआप्पा गांजरे, रा. छत्रपती शिवाजी चौक, रिसोड तसेच सुधाकर किसन टेकाळे (रा. चिखली, ता. रिसोड, जि. वाशिम) यांच्या राहत्या घरी दि.६ मार्च २०२६ रोजी दोन स्वतंत्र पथकांमार्फत झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी सुरू आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

या पथकात सहाय्यक निबंधक गजानन फाटे (रिसोड), आर. आर. सावंत (प्रशासन), एम. डी. कच्छवे (पथक प्रमुख), पी. टी. सरकटे (पथक प्रमुख), सहकार अधिकारी एस. एस. पाटील, जे. एस. सहारे, मुख्य लिपिक पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार अधिकारी कु. आर. एन. शेख, कनिष्ठ लिपिक ए. ए. बेले, व्ही. आर. ढोबळे, ए. डी. वानखेडे तसेच पोलिस व महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहारांविरोधात सहकार विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम तसेच संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय येथे गोपनीय स्वरूपात तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रिसोड यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news