Washim News : २६ वर्षीय ऑटोचालकाने घरात गळफास घेवून जीवन संपविले; रिसोडमधील घटना

Washim News : २६ वर्षीय ऑटोचालकाने घरात गळफास घेवून जीवन संपविले; रिसोडमधील घटना
Published on
Updated on

वाशीम : रिसोड येथील निजामपूर मार्गावरील कदम मळा भागात एका २६ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अमर श्रीराम गायकवाड असे मृत युवकाचे नाव असून, तो रिसोड शहरात ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अमरने राहत्या घरी गळफास घेतल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेच्या वेळी घरात कुटुंबातील अन्य कोणताही सदस्य उपस्थित नव्हता आणि घराचा दरवाजा आतून बंद होता.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अमरने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी रिसोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news