Washim News | मालेगाव तालुक्यातील शिवारात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
Washim Collector Crop Damage Inspection
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नांगरतास येथील शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या पाहणी करताना Pudhari
Published on
Updated on

Washim Collector Crop Damage Inspection

वाशिम : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मालेगाव तालुक्यातील मालेगाव व मौजे नांगरतास येथील शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम, नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.

Washim Collector Crop Damage Inspection
Washim News: वाशिम-मंगरूळनाथमध्ये पावसाअभावी सोयाबीन, तुर, मुग, उडीद पिके संकटात

यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news