IMA Opposes CCMP |सीसीएमपीधारकांना अ‍ॅलोपॅथी उपचाराची परवानगी देण्यास आयएमएचा विरोध

शासन निर्णयाच्या निषेधार्थ डॉक्टरांचा तीन दिवसांपासून संप; फेरविचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
CCMP Doctors Controversy
CCMP Doctors ControversyPudhari
Published on
Updated on

CCMP Doctors Controversy

वाशीम : सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी (सीसीएमपी) धारकांना अ‍ॅलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देण्याच्या शासनस्तरीय निर्णय प्रक्रियेला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएच्या डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारला असून, शासनाने निर्णयाचा तातडीने फेरविचार न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयएमए वाशीम शाखेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी सावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

CCMP Doctors Controversy
Washim News : जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला ५ वर्षे सश्रम कारावास

आयएमएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीएमपीधारकांना अ‍ॅलोपॅथी उपचाराची नोंदणी देण्यासंदर्भात शासनाकडून घेतला जाणारा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. एमबीबीएस, एमडी आणि एमएस यांसारख्या मान्यताप्राप्त वैद्यकीय पदव्या प्राप्त करण्यासाठी डॉक्टरांना दीर्घकालीन शिक्षण, कठोर प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव घ्यावा लागतो.

अशा परिस्थितीत अल्पकालीन अभ्यासक्रमावर आधारित सीसीएमपीधारकांना स्वतंत्रपणे अ‍ॅलोपॅथी उपचाराची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याची भूमिका आयएमएने मांडली आहे. त्यामुळे संबंधित शासन निर्णयाचा फेरविचार करून तो तातडीने स्थगित करावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संबंधित संघटनांशी चर्चा करूनच पुढील धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

CCMP Doctors Controversy
Washim news: अनसिंग बसस्थानकासमोर पाऊसाच्या पाण्याचे झाले ‘तळे'! प्रवाशांचे हाल

एमएमसी नोंदणीसही आयएमएचा विरोध

बीएचएमएस आणि सीसीएमपी पदवीधारकांना एमबीबीएस डॉक्टरांसाठी असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नोंदणी व्यवस्थेत समाविष्ट करण्यासही आयएमएने विरोध दर्शविला आहे. अ‍ॅलोपॅथी उपचाराची परवानगी ही केवळ एमबीबीएस आणि त्यापुढील मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवीधारकांपुरती मर्यादित ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शासनाने घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे असल्याचे आयएमएने नमूद केले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय सेवेत शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्याचे निकष कठोर असणे आवश्यक असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

दरम्यान, आयएमएचा विरोध कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाविरोधात नसून रुग्णांची सुरक्षितता आणि वैद्यकीय सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाने या निर्णयावर योग्य तो फेरविचार न केल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढील निर्देशानुसार लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. शिवाजी सावळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news