Washim Crime | बस स्टँड परिसरात चोरी करणारी महिला रिसोड पोलिसांच्या जाळ्यात

चोरीपा गेलेला 6,12,800/- रुपयाचा मुद्दे माल जप्त :
Washim Crime | बस स्टँड परिसरात चोरी करणारी महिला रिसोड पोलिसांच्या जाळ्यात
Published on
Updated on

वाशीम : रिसोड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे चोरी प्रकरणातील तब्बल ६ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल महिला आरोपी कडून जप्त करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता वचक पुन्हा अधोरेखित झाला आहे.

पोलीसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये रोख रक्कम व इतर साहित्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे वय 59 वर्ष रा. कमलानगर ता. शहापुर जि. ठाणे ह्या त्यांचे रिसोड येथील नातेवाईक नामे प्रकाश पंढरी मोरे यांचेकडे आल्या होत्या त्या दि. 20 रोजी परत गावी ठाणे जिल्ह्यात जाण्यासाठी बस स्टैंड रिसोड येथे 12:00 वाजता आल्या असता व काही वेळातच त्यांनी त्यांची पर्स उघडी दिसली तर त्यांनी पर्स तपासुन पाहीली सोन्याची एक पोत, दोन कर्नफुले, एक अंगठी, 2800 तसेच मोबाईल असा एकुण 6,12,800/- रु. चा माल दिसला नाही.

रिसोड पोलीसांना सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी एक पथक बस स्टैंड परीसरात CCTV फुटेज चेक करण्यास पाठविले. शेनगांव ते खिल्लार जाणा-या एका वाहनामध्ये संबधित आरोपी महिला सापडली.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड, . सहा, पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रामेश्वर चव्हाण, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि रामेश्वर नागरे, पोहेकाँ प्रशांत राजगुरु, पोकाँ विनोद घनवट, पोकौं रवी अडागळे, हेमंत सरकटे, निवोद मस्के, परमेश्वर भोणे, मपोकों वृषाली ढगे, सुषमा गायकवाड पोलीस स्टेशन रिसोड तसेच पोकों किशोर इंगोले पोलीस स्टेशन सायबर वाशिम यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news