Washim Crime |अट्टल खिसेकापू चोराला वाशिम पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

जानगिर महाराज यात्रेत खिसे कापून केले होते 50 हजार लंपास
Washim Crime |अट्टल खिसेकापू चोराला वाशिम पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!
Washim Crime |अट्टल खिसेकापू चोराला वाशिम पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!
Published on
Updated on

वाशीम : वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षात वाशिम पोलीसांनकडून धडक मोहिमा राबवून वाशिम जिल्ह्यात गुन्हे करणारे गुन्हेगार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. तसेच वाशिम मध्ये खिसा कापून पैसे चोरी करणारे आरोपींचा शोध घेवून अटक करण्यात आले आहे.

दिनांक 20/02/2026 रोजी वाशिम जिल्ह्यामधील ग्राम शिरपुर येथे जानगिर महाराज यात्रा निमित्य कुस्तीचे सामने ठेवण्यात आले होते. तेथे एका इसमाच्या खिश्यातून नगदी 50,000/- रुपये चोरी गेल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी एक टिम तात्काळ तयार करुन शिरपुर येथे रवाना केली. 27/02/2026 रोजी सदर आरोपीची माहिती घेतली असता यातील आरोपी हा पुन्हा चोरी करण्याकरीता वाशिम येथे कडे येत असल्याबाबत माहिती मिळाली.

यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मालेगांव येथे सापळा रचुन यातील आरोपी यास अकोला नाका येथुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव अब्दुल आरीफ मोहम्मद रसुल वय 26 वर्ष रा. जुने शहर अकोला जि. अकोला असे सांगीतले. त्‍याने 50,000 कबूल केले.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मँडम, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि योगेश धोत्रे व टिमने अथक परीश्रम घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news