Washim Crime | अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाचा अत्याचार

मुलीच्या वडिलांची कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार
Crime
Crimefile photo
Published on
Updated on

वाशिम : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 19 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, त्या मुलीच्या घराच्या अंगणातच हा प्रकार घडला.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना दि. 27 मार्च 2026 रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news