Washim Collector | वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ऑनलाईन माध्यमातून स्वतःची केली ‘स्व-गणना’

‘जनगणना २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ हा पहिला टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार
Yogesh Kumbhejkar self enumeration
Yogesh Kumbhejkar self enumerationPudhari
Published on
Updated on

Yogesh Kumbhejkar self enumeration

वाशिम : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणारी ‘जनगणना २०२७’ प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या उपक्रमाच्या प्रारंभानिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ऑनलाईन माध्यमातून स्वतःची ‘स्व-गणना’ पूर्ण केली.

यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणनेअंतर्गत गोळा होणारी माहिती ही देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने ती अचूक आणि योग्य प्रकारे भरावी. तसेच हा उपक्रम जनकल्याणाशी निगडित असल्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

Yogesh Kumbhejkar self enumeration
Washim Police Transfer : वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी फेरबदल; नितेश खाटमोडे नवे जिल्हा पोलीस प्रमुख

‘जनगणना २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ हा पहिला टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र शासनाने यासाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक व अचूकपणे भरावी. माहिती सादर करण्यापूर्वी ती तपासून पाहण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news