Washim Chain Snatching : वाशिममध्ये 'चेन स्नॅचिंग'चा थरार; बाकलीवाल कॉलनीत महिलेची पोत लांबवली, सलग तिसऱ्या घटनेने शहर हादरले

Washim Chain Snatching
Chain Snatching
Chain snatching incidentsfile photo
Published on
Updated on

वाशिम : शहरात भरदिवसा होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले असून, बुधवारी (८ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्थानिक बाकलीवाल कॉलनी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, शहरात सलग घडलेली ही तिसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकी घटना काय?

सुनीता दिलीप मुंदडा (५५) या काल सायंकाळी बाकलीवाल कॉलनीतील गणपती मंदिरासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुनीता मुंदडा पुरत्या हादरून गेल्या असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागरिकांचा संताप आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह

वाशिम शहरात गेल्या काही दिवसांत चेन स्नॅचिंगची ही सलग तिसरी घटना आहे. वारंवार घडणाऱ्या या लुटीच्या घटनांमुळे "शहरात खाकीचा धाक उरला आहे की नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एकाच पद्धतीच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असताना पोलीस चोरट्यांचा छडा लावण्यात अपयशी ठरत असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे.

गस्त वाढवण्याची मागणी

या दुचाकीस्वार टोळीने शहरात दहशत माजवली असून, त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि वसाहतींमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी, अशी मागणी वाशिमच्या जनतेकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news