Washim Accident | कारंजा नगर परिषदेच्या २ मुख्याध्यापकांसह चालकाचा अपघातात मृत्यू

तपोवन फाट्याजवळ भीषण अपघात; कारंजा शहरात शोककळा
Washim Accident
Washim Accident
Published on: 
Updated on: 

वाशीम : कारंजा नगर परिषद संचलित उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ चे दोन मुख्याध्यापक आणि मोटारसायकलचा चालक अशा तिघांचा अपघातात झाला. या भीषणअपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर घडली. या घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

या अपघातात कारंजा नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक-१ चे मुख्याध्यापक सैय्यद आबीद हुसैन सैय्यद रऊफ (वय ५६) आणि उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक नाझीम मोहम्मद नूर मोहम्मद (वय ५७) यांच्यासह मोटारसायकलच्या चालकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुख्याध्यापक शाळेच्या संचमान्यता कामानिमित्त कारंजा येथून वाशिम येथील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे मोटारसायकलने जात होते. दरम्यान, शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुख्याध्यापकांसह पल्सर चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकप्रतिनिधी, शिक्षकांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच कारंजा नगर परिषदेचे गटनेते बिलाल पुंजानी, उपाध्यक्ष ॲड. फिरोज शेकुवाले, शिक्षण सभापती जाकीर शेख, नियोजन सभापती नदीम राज यांच्यासह मृतांच्या नातेवाईकांनी व शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Washim Accident
Washim Drought | दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके समाविष्ट; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

अपघातानंतर पुढील कार्यवाहीसाठी तिघांनाही मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही मुख्याध्यापक हे कारंजा नगर परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असल्याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. शालेय कामानिमित्त प्रवास करत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कारंजा नगर परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Washim Accident
Washim Burglary | वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारी ‘चड्डी-बनियान’ टोळी जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news