Washim Accident | चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्याने 2 जण जागीच ठार तर 3 गंभीर जखमी

वाहन थेट रस्त्याखाली कोसळले, मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी येथे अपघात
Washim Accident
Washim Accident
Published on
Updated on

वाशीम : मुर्तीजापूर कडून कारंजा लाडचा दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली कोसळून भीषण अपघात झाला.या अपघातात दोन जन जागीच ठार तर 3 जन जखमी झाले आहेत. ही घटना दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापूर येथील आपत्कालीन पथकाचे सुनील लच्छवाणी व त्यांच्या मित्र परिवाराने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार यशवंत घनश्याम राठोड (वय ३१), अक्षय संजय रोकडे (वय २७) व ओम दीपक मुंदे (वय १९) सर्व राहणार कारंजा लाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा उपचार केंद्र, अकोला येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात रोहित भगवानदास रिक (वय २५) व संकेत राजेश मेश्राम (वय २५)रा. कारंजा लाड जि. वाशीम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्वजण कारंजा लाड जि. वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news