

16 Lakh Robbery Tirupati
वाशीम : घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी एका घरामधून तीन लाख रुपये रोख आणि तेरा लाखाचे दागिने असा सोळा लाख रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना आज २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील गजबजलेली वसाहत असलेल्या तिरुपती सिटी मध्ये वास्तव्यास असलेले सुनील नामदेवराव राऊत हे मागील तीन ते चार दिवसापासून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सुनील राऊत यांच्या घरामधील तीन लाख रुपये रोख आणि तेरा लाख रुपयांचे दागिने असा एकूण सोळा लाख एवज लंपास केला.
या संदर्भात सुनिल राऊत यांनी वाशीम शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.