HSC exam copy case
वाशिम
HSC exam copy case | सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षक कारवाईनंतर, शिक्षक संघटनाचा आक्रमक पवित्रा
सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप; परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा...
अजय ढवळे
वाशीम : वाशिम जिल्ह्यातील टो येथील श्री मैनागिरी महाराज विद्यालयातील ५८१ विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपी प्रकरणी 26 शिक्षकांचे निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
शिक्षण अधिकारी ससाने यांच्याकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय. तर केलेली कारवाई मागे नं घेतल्यास सर्व परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटने कडून देण्यात आलाय.
काल भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान ससाने यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी दरम्यान कोणताही गैर प्रकार झाला नव्हता केवळ तीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेवर डॉट आढळून आले होते. यालाच सामूहिक कॉपी म्हणत कारवाई करण्यात आली ही कारवाई विध्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर अन्यकारक आहे असंही शिक्षकांनी सांगितलंय.

