

ST Bus Overturns Washim
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाटा येथे आज (दि.११) शेगाव ते उमरखेड जाणारी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 14 बीटी 4362 क्रमांकाची बस वाशिम बसस्थानकातून निघाल्यानंतर उमरखेड कडे जात असताना एका बाईक चालकाने अचानक बससमोर बाईक आडवी आणल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.
अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले तर उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसणे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे.