Samruddhi Mahamarg Traffic Block: समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; मुंबईकडे जाण्यापूर्वी वेळापत्रक पाहा

समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बारा दिवसांचा टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Samruddhi Mahamarg Traffic Block
Samruddhi Mahamarg Traffic BlockFile Photo
Published on: 
Updated on: 

Samruddhi Mahamarg Traffic Block

वाशिम : अजय ढवळे

समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समृद्धी महामार्गावर २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बारा दिवसांचा टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या संदर्भात नियोजन केले आहे.

हा बदल प्रामुख्याने भरवीर (नाशिक) इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असेल. या परिसरातील डोंगराळ भागात बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ आणि उतारावर दरड अथवा दगड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी लोखंडी संरक्षणात्मक जाळ्या बसवण्याचे काम केले जाणार आहे. पावसाळ्यानंतर सुरक्षिततेची खबरदारी म्हणून हे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईवरून नागपूरकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहील.

Samruddhi Mahamarg Traffic Block
Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने ट्रकला आग, दोघे ठार

महामार्ग पोलिसांच्या समन्वयाने १२ दिवसांच्या काळात दररोज तीन सत्रांमध्ये प्रत्येकी एका तासासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाईल. सकाळी १० ते ११, दुपारी १ ते २ आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत ही वाहतूक थांबवण्यात येईल. या निर्धारित वेळेव्यतिरिक्त इतर वेळी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू राहील.

हे काम पूर्ण झाल्यानंतर ७ नोव्हेंबरपासून महामार्ग नियमित वेळेनुसार सुरू होणार असून, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Samruddhi Mahamarg Traffic Block
Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या सूत्रधाराला बीड जिल्ह्यातून अटक; गाडीतील कॅमेऱ्यात चेहरा दिसला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news