बंजारा विरासत संग्रहालयाच्या उद्घाटनाचे भाग्य मला मिळाले : पीएम मोदी

PM Modi Washim Visit | बंजारा विरासत संग्रहालय, नगारा भवनचे लोकार्पण
PM Modi Banjara Heritage Museum inauguration
बंजारा विरासत संग्रहालयाचे आणि नगारा भवनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ANI X Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंजारा विरासत संग्रहालयाचे आणि नगारा भवनचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले. संग्रहालय पाहून खूप आनंद झाला. या संग्रहालयाचे काम उत्कृष्ट केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.५) केले. बंजारा विरासत संग्रहालयाचे आणि नगारा भवनचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी बंजारा भाषेतून आपल्या भाषणाला सुरूवात केली.

यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी मोदी यांनी संत सेवादल, रामराव महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. जगदंबा देवीचे दर्शन घेतले.

मोदी पुढे म्हणाले की, पीएम किसान सन्मान किसान निधीचा १८ वा हफ्ता आज वितरीत केला आहे. साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या योजनामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला फक्त लूट करायचे माहीत आहे, असा निशाणा मोदी यांनी यावेळी साधला.

तर दुसरीकडे काँग्रेसला फक्त लूट करायचे माहीत आहे, असा निशाणा मोदी यांनी यावेळी साधला. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या ड्रग रॅकेटमधील मुख्य आरोपी हा काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेस तरुणांना ड्रग्ज आणि त्याच्या व्यसनाकडे ढकलायचे काम करत आहे. त्यातून मिळणारा पैसा निवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काँग्रेसकडून केला जाणार असल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news