

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि.२३) दहशतवादी हल्ला झाला. या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत.
दूरध्वनी क्रमांक : 0194-2483651 / 0194-2457543
व्हॉट्सअॅप क्रमांक : 9049589693 (श्री. शाहू भगत – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम) तसेच, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष या क्रमांकावरही संपर्क साधावा – 07252-234238.
वाशिम जिल्ह्यातील कोणी नागरिक, पर्यटक किंवा त्यांचे नातेवाईक जर पहलगाम परिसरात अडकल्याची माहिती असेल, तर त्यांनी तत्काळ वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.