

वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानिक श्री पदमेश्वर संस्थान येथे भव्य शिव- पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त २५ तारखेला संध्याकाळी ७ वाजता महादेवाला हळद लावण्यात येईल.
तसेच २६ तारखेला महादेवाची श्री. पदमेश्वर संस्थान येथून सायंकाळी ६ वाजता वरात निघेल. ही वरात श्री. पदमेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर येथून थेट श्री पदमेश्वर संस्थान येथे पोहचणार आहे. २६ तारखेला रात्री १२ : ०० वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
वाशिममध्ये भव्य प्रमाणात एवढा मोठा सोहळा श्री. पदमेश्वर आरती मंडळ साजरा करणार आहे. तरी वाशिमच्या सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक श्री. पदमेश्वर आरती मंडळ, श्री. पदमेश्वर संस्थान, वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.