Washim Lightning death: मांगुळ झनक येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या पावसात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.
Death
Death File Photo
Published on
Updated on

Washim Lightning death

वाशिम: रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या पावसात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.

गजानन शेषराव सुरुशे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर विशाल नंदकिशोर लेमडे आणि रवी रंजित कोरडे यांच्या पायाला गंभीर इजा होऊन जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रिसोड येथील डॉ. प्रशांत आटोळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे मांगुळ झनक गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनी पावसाळ्यात वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Death
Washim accident: भीषण अपघात! उभ्या कंटेनरला कारची जोरदार धडक; चालक जागीच ठार...

मुंबईत आतापर्यंत बरसला ७५ टक्के पाऊस

मुंबई शहर व उपनगरात पावसाची रिमझिम सुरूच असून आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ७५ टक्के पाऊस पडला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद उपनगरात झाली आहे. २०२५ मध्ये ही टक्केवारी ५० ते ५२ टक्के इतकीच होती. मुंबई शहरात जून अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मुंबईत समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसाच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे.

पावसाचे अजून दोन महिने शिल्लक असल्यामुळे यावेळी वार्षिक सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहर विभागात वार्षिक सरासरी २०९५ मिमी पाऊस होतो. तर उपनगरामध्ये सरासरी २,३१९ मिमी पाऊस होतो.

Death
Washim Crime : १५ वर्षांपासून फरार असलेली खुनातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; वाशिम 'एलसीबी'ची लोणावळ्यात कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news