कुंभमेळ्याहून परतताना रिसोडचा भाविक ठार; २ जखमी

Washim Accident News | सत्ना ते रिवा महामार्गावर घटना
 Washim Accident News
गोपी वाघ यांचा कुंभमेळ्याहुन परतताना अपघातात मृत्यू झाला.Pudhari Photo
Published on
Updated on

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : कार ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात रिसोड येथील भाविक ठार झाले. तर दोघे जण जखमी झाले. ही घटना सत्ना ते रिवा (मध्यप्रदेश) महामार्गावर आज (दि.१०) सकाळी घडली. या अपघातात व्यापारी व फोटो ग्राफर गोपी वाघ, (वय ४५, रा. रिसोड ) यांचा मृत्यू झाला. तर आनंद बुट्टे, व गिरी हे दोघे जखमी झाले. (Washim Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, रिसोड येथील वाघ प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. ते आज घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना महामार्ग रुग्णवाहिकेने तत्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . या घटनेमुळे रिसोड शहरावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास मध्य प्रदेश पोलीस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news