'जैन अल्पसंख्यांक महामंडळा'चे अध्यक्ष ललित गांधी शनिवारी वाशिम दौऱ्यावर

Lalit Gandhi Washim Visit | सकल जैन समाजास उपस्थित राहण्याचे आवाहन
Lalit Gandhi Washim Visit
अध्यक्ष ललित गांधी शनिवारी वाशिम दौऱ्यावर येणार आहेत. Pudhari Photo
Published on
Updated on

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी यांचे शनिवारी (दि. १ मार्च) सायंकाळी ६ वाजता शहरात आगमन होणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील सकल जैन समाज बांधवांनी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Lalit Gandhi Washim Visit)

सकल जैन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास या स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाच्या माध्यमाने जैन समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच विविध योजनांची माहिती देण्यासाठी अध्यक्ष ललित गांधी यांनी वाशिम दौऱ्याचे नियोजन केले आहे. ललित गांधी हे १ मार्चरोजी सायंकाळी ६ वाजता हिंगोलीहून वाशिम येथे येणार आहे. यावेळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे. (Lalit Gandhi Washim Visit)

Lalit Gandhi Washim Visit
वाशिम शहरात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news