

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांना घेऊन चार डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (दि ३) वाशिमच्या जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्याना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात भरघोस वाढ करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी,अंगणवाडी कर्मचाऱ्याना कामासाठी नविन मोबाईल द्यावा, मार्च २०२० पासून अमृत आहार कामाचे थकीत मानधन देण्यात यावे या सह विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या.