Washim news: कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट; रिसोडमध्ये पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.
crime news
crime newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Washim news:

वाशीम : रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. कल्पना योगेश ढवळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कल्पना यांना प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी पती योगेश ढवळे पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

crime news
Washim News: वाशिममध्ये सावत्र बापाने केला १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल

ही घटना घडत असताना मृत महिलेच्या मुलाने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक आणि परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.

पती योगेश ढवळे हा मूळचा वाशीम येथील काळे फैल परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. तो गेल्या काही वर्षांपासून परभणी येथे स्थायिक झाला होता. योगेश ढवळे हा एका खासगी कंपनीत नोकरीला असून, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तो रिसोड शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात एका घरात भाड्याने राहायला आला होता.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

crime news
Washim news: कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला विरोध; प्रेमीयुगलाचा तलावात उडी घेऊन शेवट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news