

वाशिम : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे त्यांचे आगमन होईल.
२६ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथून पोलिस कवायत मैदानाकडे रवाना होतील. सकाळी ९.१५ ते १०.३० वाजपर्यंत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता वाशिम येथून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.