वाशिम : पुरात वाहून गेल्याने 23 वर्षीय मुलीचा मृत्यू

चिंचखेडा-कासोला एकेरी मार्गावरील अपघात
Death of a young woman who was swept away in the flood
पूरात वाहुन गेलेल्या तरुणीचा मृत्यूPudhari Photo

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : चिंचखेडा-कासोला या गावातील लहान पुल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कासोला येथील एका 23 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.17) घडली. पुलावरुन जात असताना पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली.

Death of a young woman who was swept away in the flood
भंडारा : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कासोला गावात राहणारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण ही तिच्या वडिलांसोबत वाशिम तालुक्यातील देवगावमध्ये मामाकडे गेली होती. सायंकाळी घरी परतत असताना, वडील व मुलगी दोघेही दुचाकीवरून घराकडे जात होते. तेव्हा चिंचखेडा ते कासोला या दरम्यानचा भूस्तर पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न लागल्याने दुचाकी पुरात पडली.

Death of a young woman who was swept away in the flood
परभणी: मानोली येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

या घटनेत दुचाकीसह दोघेही वाहून गेले. मात्र, वडिलांनी झाडाला धरून आपला जीव वाचवला. दोन किलोमीटरच्या पुढे पाण्याचा प्रवाह संपला. परंतु अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने वडील सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीचा नदीकाठी शोध घेतला. मात्र कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी चिंचखेडा गाठून गावकऱ्यांना माहिती दिली. यानंतर ती नांदगाव येथे तीन तास शोध घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत किनाऱ्यावर सापडली. तिला वाशिम रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news