Washim News| समृद्धी महामार्गावर सापडला कुजलेला मृतदेह, परिसरात खळबळ

Washim News| वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News (
Crime News (
Published on
Updated on

वाशीम, दि. 11 (प्रतिनिधी अजय ढवळे) :
वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालेगाव ते शेलुबाजार या दरम्यानच्या चॅनल २१८ जवळ, मुंबई कॉरिडोरवरील बॅरिकेटजवळ एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह दोन भागांमध्ये आढळल्यामुळे हा अपघात आहे की खून, याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत.

Crime News (
Washim PWD Raid | वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज मोठी कारवाई...

घटनास्थळावर स्थानिक पोलिसांनी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, या व्यक्तीचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह मुंबई कॉरिडोरच्या बॅरिकेटला लागून पडलेला होता. शरीर दोन तुकड्यांत असल्याने काहींनी हा अपघात असावा अशी शक्यता वर्तवली आहे, तर काहींचे म्हणणे आहे की मृतदेह अन्य ठिकाणाहून आणून येथे टाकण्यात आला असावा. यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास विविध कोनातून सुरू केला आहे.

Crime News (
Washim News | लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधमास ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’

घटनास्थळावरून काही कपड्यांचे तुकडे आढळले आहे. त्यातून काही पुरावे मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे.

तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तसेच या प्रकरणी कोणाचा सहभाग आहे का, यासाठी जवळपासच्या गावांतील हरवलेल्या व्यक्तींची यादी तपासली जात आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीही या महामार्गावर अपघाताच्या घटना घडल्या होत्या. आता या मृतदेहाच्या सापडण्याने स्थानिक प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news