

वाशीम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आज (दि.३) धरणे आंदोलन करण्यात आली. (Washim Congress News)
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, नापिकी व अतिवृष्टीचे पैसे देण्यात यावे, स्पिंकलर व ठिबक सिंचनाचे अनुदान मिळावे, आदी मागण्यांसाठी काँग्रेसने धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. (Washim Congress News)
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार व वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. यावेळी दिलीपराव सरनाईक (प्रदेश सरचिटणीस, डॉ. श्याम गामणे, चक्रधर गोटे, वैभव सरनाईक, किसनराव म्हस्के, राजू चौधरी, मधुकर जुमडे, चंद्रकांत साठे, दिलीप मोहनावले, संदिप घुगे आदी उपस्थित होते.