

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे एका शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र तो फरार झाला आहे. गजानन माणिकराव बाजारे ( वय 57 रा. शिक्षक कॉलनी कारंजा ) असे या शिक्षकाचे नाव आहे.
दि. ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान दोन मुली पिंपरी फॉरेस्ट येथून दहावीचा पेपर दिल्यानंतर गजानन बाजारे यांच्या गाडीमध्ये बसून कारंजाकडे येत होत्या. त्या गाडीमध्ये आणखी दोन शिक्षक होते. गाडी कारंजाकडे येत असताना फिर्यादी मुलगी व तिची मैत्रीण गाडीच्या मागच्या सीटवर बसल्या होत्या. तेव्हा आरोपी शिक्षक हा दारू पिऊन होता. तो ड्रायव्हरच्या बाजू असलेल्या सीटवर बसल्याने त्याने त्याची सीट मागे घेतली आणि त्या दोघींना म्हणाला की, मी तुमच्या दोघींना पेपर सोडवण्यासाठी कॉपी पुरवतो तसेच त्या शिक्षकाने थेट शरीर सुखाची मागणी करत त्या मुलींवर अत्याचार केले.
ही बाब गाडीतील इतर दोन शिक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच गाडी थांबून 'त्या' दोन मुलींना खाली उतरवले आणि ऑटोत बसून घरी पाठवून दिले. दरम्यान त्या दोन्हीं मुली खुप घाबरलेल्या होत्या. त्यांनी ही सर्व घटना आपल्या आईवडिलांना सांगितल्याने ५ मार्च रोजी फिर्यादी मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी गजानन माणिकराव बाजारे या शिक्षकाविरुद्ध कलम ७४,७५ बी.एन.एस ८,१२ पाँक्सो कलम ३५४,३५३ अ अंतर्गत कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडारे यांच्या मार्गदर्शनात पी. एस. आय सुरगडे करीत आहेत.