वाशिम : ट्रक आणि दुचाकीचा अपघातात सख्या भावांचा मृत्यू

वाशिम मधील मंगरुळपिर मार्गावरील घटना
Vashim Accident
ट्रक आणि दुचाकीचा अपघातात सख्या भावांचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

वाशिम : अजय ढवळे

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ रविवारी (दि.31) भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृ्त्यू झाला. राजू देवराव खोरणे (वय.30 वर्षे ) आणि अनिल देवराव खोरणे (वय. 27) असे मृतांचे नाव आहेत. ट्रकने दिलेल्या जोराच्या धडकेत हे दोघे जागीच ठार झाले.

Vashim Accident
अरुणाचलमध्ये भीषण अपघात; लष्कराचे ३ जवान शहीद, ४ जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू आणि अनिल वाशिमवरून दुचाकीने त्यांच्या गावी पारडी येथे जात होते. तेव्हा रस्त्यावरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच 30 एव्ही 0007) त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. हा अपघात भीषण असल्याने जोरात दिलेल्या धडकेमध्य़े दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news