Amravati Teachers Constituency Election | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबररोजी मतदान

निवडणुकीची सूचना जारी, ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार
 Teachers Constituency Election
Electionfile photo
Published on: 
Updated on: 

Amravati Teachers Constituency Election Notification

वाशीम : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली असून त्यानुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, अमरावती यांनी निवडणुकीची सूचना मंगळवारी (दि.२९) प्रसिद्ध केली आहे.

निवडणूकीसाठीची नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचेकडे मंगळवार ६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात सभागृह क्र. २ तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.

 Teachers Constituency Election
Washim News: वाशिममध्ये सावत्र बापाने केला १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोस्को अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल

नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांचे कार्यालयातील सभाकक्ष क्र. २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प अमरावती येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास शुक्रवार २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. असे या सुचनेव्दारे घोषित करण्यात आले आहे.

ही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबरोबरच विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त, नगरपालिका तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायती कार्यालयातही प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. असेही निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news