Washim Farmers Protest | आंदोलनाकडे दुर्लक्ष अडोळी ग्रामस्थांनी रिसोड - वाशिम रस्ता रोखला

चक्क गाव विक्री करून कर्ज माफी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचे ४ दिवसांपासून ठिय्या आंदोलन
Farm Loan Waiver Demand
ग्रामस्थांनी अडोळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधलेPudhari
Published on
Updated on

Farm Loan Waiver Demand

वाशिम : तालुक्यातील अडोळी येथे दि.२ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरसकट कर्जमाफी द्या, पीक विमा लागू करा, सातबारा कोरा करा, एमआयडीसी प्रकल्प सुरू करावा, आदी मागण्यांसाठी चक्क गाव विक्री करून कर्ज माफी करावी, म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या आंदोलनाला तहसीलदार, खासदार यांनी भेट दिली. परंतु, या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून सरकार मधील व्यक्ती येऊन आमच्या मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Farm Loan Waiver Demand
Washim Crime | ग्राहक असल्याचे भासवून भरदिवसा सराफा दुकानातून 5 लाखांच्या सोन्याची चोरी!

ग्रामस्थांनी अडोळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधले. ग्रामस्थांनी पाच महिला फाटा या ठिकाणी रिसोड वाशिम रस्ता अडवून धरला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news