वाशिममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

शहरात संतापाचे वातावरण
वाशिममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
file photo
Published on
Updated on

वाशिम : वाशिम शहरातील अकोला नाका येथील एका दुकानात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. ज्यामध्ये दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या 7 वर्षाच्या चिमुरडीवर एका तरुण दुकानदाराने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडल्याने देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशा स्थितीत वाशिम शहरात एका निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने वाशीम शहरात खळबळ उडाली आहे. स्थानिक अकोला नाका संकुलात विवेक ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. बुधवार 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास एक 7 वर्षांची चिमुरडी आईस्क्रीम घेण्यासाठी या किराणा दुकानात गेली. यावेळी कलश दीपक छाबरा (१९) याने तिला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने मुलीचे पालक दुकानात गेले असता त्यांना मुलगी आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता आईला पाहून मुलगी रडू लागली, त्यामुळे आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचे आईला समजले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी कलश छाबरा याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी कलश दीपक छाबरा याच्याविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कलश याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. याप्रकरणी कडक कायदे असूनही अशा मानसिकतेच्या गुन्हेगारांमध्ये भीती नाही. अशा परिस्थितीत मुली आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news