मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाशिम दौरा | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाशिम दौरा

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (दि. ४ मार्च) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

सकाळी ११.२५ वाजता पोलीस मुख्यालय हेलिपॅड वाशिम येथे आगमन, सकाळी ११.३० वाजता सुंदर वाटीका चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनचे लोकार्पण, दुपारी १२.२५ वाजता अकोला नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थिती, दुपारी १२.४५ वाजता आमदार किरण सरनाईक यांची सदिच्छा भेट, दुपारी १ वाजता जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे भव्य महिला मेळाव्याला उपस्थिती, दुपारी २.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे विविध शिष्टमंडळ भेटीसाठी राखीव, त्यानंतर दुपारी २.५५ वाजता नियोजित कार्यक्रमासाठी जळगावकडे प्रयाण करतील.

Back to top button