वाशिममध्ये दोन चोरांकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

वाशिममध्ये दोन चोरांकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांच्या टोळीला अटक करुन ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे बुधवारी (दि.१३) फिर्यादी नामे चैनसिंग मंगुसिंग तवर (वय ४० वर्ष रा. भालतपुरा ता. भिकनगांव जिल्हा खरगोट मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तकारीवरून पो.स्टे. वाशिम ग्रामीण अज्ञात आरापीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, पोलिसांनी आऱोपी रामदास अशोक धोगंडे (वय २३ वर्ष रा. जांभरुन परांडे), नामे राहुल गजानन करवते (वय २५ वर्ष रा. सिव्हील लाईन वाशीम) यांनी ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यासंबंधी विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसानी त्यांच्याकडून ट्रॅक्टर, एक मोटार सायकल यासह अन्य काही वस्तू असा ६ लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला. यातील आणखी २ आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन वाशीम ग्रामीण हे करीत असल्याने नमुद आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन वाशीम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अनुज तारे (भापोसे), यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम सुनिल पुजारी पोनि रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि जगदिश बांगर, पोहवा गजानन अवगळे, गजानन झगरे, संतोष कंकाळ, प्रविण शिरसाट, पोलीस नाईक ज्ञानदेव भात्रे, गजानन गोटे, पोलिस शिपाई दिपक : घुगे, शुभम चौधरी, चालक पोलिस नाईक स्वजिल तुळजापुरे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी पर पाडली.

Back to top button