इडीचा त्रास होऊ नये म्हणून आमचे काही सहकारी भाजपकडे गेले : अनिल देशमुख | पुढारी

इडीचा त्रास होऊ नये म्हणून आमचे काही सहकारी भाजपकडे गेले : अनिल देशमुख

वाशिम; अजय ढवळे : राज्यात गेल्या दीड   वर्षापासून फोडाफोडीचे राजकारण चालू असून जो ईडीचा त्रास अनिल देशमुख यांना झाला, हा आपणास होऊ नये या उद्देशाने आमचे का.ही सहकारी भाजपकडे गेले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की 2014 पासून महागाई वाढत असून मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पुरे केली नसून आतापर्यंत 18 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. परंतु तो मिळाला नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर केली. राज्यातील सर्व उद्योग गुजरात कडे वळविण्यात येत असून कापूस परदेशातून मागविण्यात येत असल्यामुळे देशातील कापूस तूर सोयाबीन आधी मालाचे भाव पडले आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे माधवराव अंभोरे सुनील पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना माजी मंत्री देशमुख म्हणाले की आ.रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा प्रारंभ २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी पुणे येथून राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. एकूण ४५ दिवस ही पद यात्रा चालणार असून ८०० कि.मी.चे अंतर संघर्ष यात्रेतून कापावे लागणार आहे. युवा संघर्ष पद यात्रा आ.रोहीत पवार यांनी सुरु केल्याने या पदयात्रेला महाराष्ट्रात युवकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. वाशिम जिल्हयात युवा संघर्ष यात्रा २९ नोव्हेंबर २०२३ रोजी येत असून सर्वसामान्य जनता, युवावर्ग, शेतकरी, महिला वर्ग आदींचे प्रश्न  सरकारने गांभीर्याने घ्यावे तसेच याबाबतची सर्व माहिती युवा संघर्ष पद यात्रेच्या  माध्यमातून घेवून  ती सर्व माहिती  विधानसभेमध्ये उपस्थित करुन सर्व सामान्यांना योग्य तो न्याय मिळवून देणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बोलताना दिली.

Back to top button