

वाशीम : आज सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान स्थानिक पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील पोलीस अमंलदार पेट्रोलींग मध्ये असताना त्यांना मोरपंखी रंगाच्या ज्युपीटर या मोटार सायकल वर एक व्यक्ती कपडयाच्या थैलीमध्ये काहीतरी संशयास्पद घेवुन जात असल्याचे दिसुन आले.यावेळी पोलीस अमंलदार यांनी त्याला थांबवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव यश अनिल राठी (वय 25 ) रा. सिव्हील लाईन वाशिम असे सांगितले.
त्याच्या जवळील कपडयाची थैली चेक केली असता त्यामध्ये रोख रक्कम दिसुन आली. त्याबाबत यश राठी यांना विचारणा केली असता त्यांनी या थैली मध्ये 25,00,000/-रु. रोख रक्कम असल्याचे सांगुन ही रक्कम अॅक्सीस बँक वाशिम येथुन विड्रॉल केल्याचे सांगितले. याबाबत खात्री करणे आवश्यक असल्याने यश अनिल राठी रा.वाशिम याला वाहनासह पोलिस स्टेशनला आणले. पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील स्टेशन डायरीत याबाबत नोंद करण्यात आली.
सध्या महाराष्ट्र राज्या मध्ये आदर्श आचार संहिता लागु असुन निवडणुक आयोगाच्या निर्देशना नुसार कोणत्याही व्यक्तीला 50,000/-रुपयापेक्षा जास्त रक्कम बाळगता किंवा वाहतुक करता येत नसल्याने ही रोख रक्कम दोन पंचा समक्ष कारवाई करुन ती पंचाच्या व ज्याच्या कडुन जप्त केली त्याच्या सहीचे लेबल लावुन जप्त करुन त्या बाबत सविस्तर जप्ती पंचनामा तयार करण्यात आला आहे.