

वर्धा : वाळूची चोरटी वाहतूक करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करत १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाळूसाठा, टिप्पर ट्रकसह १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.२) समद्रपूर शिवारात करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गिरड मार्गाने समुद्रपूरकडे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून समुद्रपूर शिवारात नाकाबंदी करण्यात आली. एकामागे एक आलेले ट्रक थांबवून पाहणी केली असता वाळूसाठा मिळाला. वाळू वाहतूक करणार्यांकडे परवानगी नव्हती. भंडारा येथून ही वाळू वाहून आणण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी सहा ट्रक - टिप्पर, ६० ब्रास वाळू असा १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेख रशिद शेख हबीब (रा. हबीबनगर अमरावती), मनील जंगू धुर्वे (रा. कसाईखेडा अमरावती), जुबेर खान (रा. अमरावती), अतुल अशोक भगत (रा. हुसनापूर, ता. देवळी), निकेश सुखदेव मेश्राम (रा. कारला चौक वर्धा), प्रतिम अशोक उईके (रा. सेलडोह, ता. सेलू), पंकज भोलाजी मडावी (रा. सेलडोह, ता. सेलू), बबलू उर्फ ईरशाद पठाण (रा. वर्धा), शेख नसीब शेख रफीक (रा. ताजनगर अमरावती), मौसिन खान (रा. वर्धा) शैलेश चंद्रकांत शेंद्रे (रा. तिगाव, वर्धा), तुषार रमेश सोनटक्के (रा. सेलडोह) , अजहर खान (रा. वर्धा), शेख रुबेज अजिज शेख (रा. वर्धा) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण, समुद्रपूचे पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक अनिल दरेकर, रामदास दराडे, शुभम कावडे यांनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.