Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक; दोन गंभीर जखमी

चॅनेल क्र. ८२.२०० परिसरात अज्ञात वाहनाला टेम्पोने मागून दिली धडक
Samruddhi Expressway Accident
Samruddhi Expressway Accident Pudhari
Published on
Updated on

Samruddhi Expressway Tempo Collision

वर्धा : समृद्धी महामार्गावर समोर चालणार्‍या अज्ञात वाहनाला टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्रमांक ८२.२०० विरुळ शिवारात २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.

जखमींची नावे चंदन यादव (वय ३०), रा. वसई, मुंबई, फैजान अहमद (वय ४०), रा. उत्तर प्रदेश आजमगड अशी आहेत. चालक चंदन यादव आणि फैजान अहमद एमएच ४८ डीक्यू १९४९ क्रमांकाचा टेम्पोने नागपूरहून मुंबईकडे जात होते. दरम्यान, चॅनेल क्र. ८२.२०० परिसरात पुढे असलेल्या अज्ञात वाहनाला टेम्पोने मागाहून धडक दिली. यामध्ये चालक चंदन यादव आणि फैजान अहमद असे दोघेही गंभीर जखमी झाले.

Samruddhi Expressway Accident
Washim Samruddhi Expressway Parking Scam|वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली!

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र जामचे पथकाने घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य केले. जखमींना हायवे अ‍ॅम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय, पुलगाव येथे उपचारासाठी पाठविण्यता आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

घटनास्थळी महामार्ग पोलिस मदत केंद्र जाम येथील सहायक पोलिस निरीक्षक सरिता यादव, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, भारत पिसुड्डे, भोगे, संदीप झिले, अमोल इंगोले, नितीन काकडे यांनी भेट देत मदतकार्य करत कार्यवाही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news