

वर्धा : जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी बरसत आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस बरसत आहे. मागील २४ तासांमध्ये काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुसळधार पावसाने काही भागात हजेरी लावली. त्यामध्ये पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी झालेल्या मंडळांतम आर्वी तालुक्यातील आर्वी मंडळात ७४, वाढोणा मंडळात सर्वाधिक ११०.३, विरुळ मंडळात ७८.८ तर रोहणा मंडळात ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्याील केळझर मंडळात ६५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वर्धा २२.२, सेलू ३७.६, देवळी २१.३, आर्वी ६६.१, आष्टी ३९.२, कारंजा १४.१, हिंगणघाट २.८, समुद्रपूर २.० असा सरासरी २३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला.