

Wardha Fraud Accused Arrested
वर्धा : फसवणुकीच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई पुलगाव पोलिसांनी केली. नोकरी लावून देत असल्याचे खोटे सांगून १२ लाख रुपयांनी फसवणूक केल्याबाबत पोलीस स्टेशन पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रारीवरून मे २०२५ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी राजीव हिरास्वामी रेड्डी (रा. मानकापूर नागपूर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशाप्रमाणे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले, ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन पुलगाव येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके, पोलीस अंमलदार अमोल आडे, सिद्धू सोमकुवर आणि मयुरी झोपाटे यांनी प्राप्त माहितीचे आधारे आरोपीस २९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून पहाटे अटक केली.
आरोपीने नोकरी लावून देतो असे खोटे सांगून मागील आठ वर्षात अनेक लोकांची इतर आरोपींच्या मदतीने लाखो रुपयाची फसवणूक केली असून बर्याच गुन्ह्यात तो पसार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.