वर्धा : तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Wardha crime : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
illegal tobacco seizure
तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह पोलिसांनी १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
Published on
Updated on

वर्धा : दिल्ली येथून सिंदी (रेल्वे) मार्गे मुंबईकडे सुगंधीत तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह १ कोटीचा मुद्देमाल सोमवारी (दि.६) जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृध्दी महामार्गावर परिसरात केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गस्त घालत असताना तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर समृध्दी महामार्गावरून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अधिकार्‍यांना पत्र देत पंचांसमक्ष नाकाबंदी करून पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला. त्यानंतर कंटनेर सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्याच्या परिसरात नेऊन कंटेनर चालक शाहीद ईलीयास (वय ३२) व हाकमखान शाकिरखान (वय २२, दोघेही रा. अडवर, ता.जि. नुह (मेवात), हरियाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यारन कंटेनरमधील मुद्देमाल दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा (रा. दिल्ली) या दोघांचा असल्याची माहिती पुढे आली. त्यांनतर पोलिसांनी सुगंधीत तंबाखू, गुटख्यासह कंटेनर असा १ कोटी ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तंबाखू, गुटखा दिसू नये, याकरिता कंटेनरमध्ये सुरुवातीला चप्पलांसह इतर साहित्य ठेवलेले होते. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केल्यानंतर तंबाखू व गुटखा आढळून आला. याप्रकरणी गाडीद ईलीयास (वय ३२) हाकमखान शाकिरखांन (वय २२, दोघेही रा. अडवर, जि. नुह (मेवात), हरियाणा), दीपक ट्रान्सपोर्ट मालक व विकास अवडा (दोघेही रा. दिल्ली) वाहन मालक अशिना विकास छाबडा (रा. दिल्ली) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, राहुल इंटेकार, बालाजी लालपालवाले, नरेंद्र पाराशर, मनिष श्रीवास, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अमोल नगराळे, नितीन ईटकरे, गोपाल बावणकर, सागर भोसले, मंगेश आदे, मिथून जिचकार, प्रफुल्ल पुनवटकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news