Wardha police raid: अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली
Crime News
Crime News
Published on
Updated on

वर्धा : वर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत व्हिडिओ गेम मशिनसह सुमारे ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शास्त्री चौक परिसरात धाड टाकली. पोलिसांचे वाहन पाहताच परिसरातील काही जणांनी पळ काढला. संबंधित गाळ्याची पाहणी केली असता तेथील एका इसमाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव रोहित किशोर अर्क (वय ३२, रा. हिंगणघाट फेल, पुलगाव) असे सांगितले.

पुढील चौकशीत संबंधित गाळा हा प्रवीण वाघमारे (रा. हिंगणघाट) याने भाड्याने घेतल्याचे उघड झाले. त्याच्या सांगण्यावरूनच येथे व्हिडिओ गेम पार्लर चालविले जात असल्याची माहिती समोर आली. या पार्लरसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून १० व्हिडिओ गेम मशिन, मोबाईल फोन, खुर्च्या तसेच रोख ६,८०० रुपये असा एकूण ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शरद गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news